मुख्यमंत्री योजना दूत | MahaYojana Doot Online Apply

MahaYojana Doot Registration :महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते . 6 सप्टेंबर 2024 पासून महाराष्ट्र सरकारने “महा योजना दूत” भरती काढली आहे . प्रतेक गावामध्ये एक योजना दूत हा नेमण्यात येणार आहे . सुमारे 50,000 योजना दूत हे नेमण्यात येणार आहेत . सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .

महाराष्ट्र सरकारने विविध योजना राबवण्याचे काम ही हाती घेतले आहे. या सर्व योजनांचा लाभ हा सर्व नागरिक यांच्या पर्यन्त पोहचवा म्हणून प्रतेक ग्रामपंचायत मध्ये 1 योजना दूत नेमण्यात येणार आहे .

योजना महा योजना दूत भरती
राज्य महाराष्ट्र
कालावधी 6 महीने
लाभ 10,000 प्रती महिना
वय 18 ते 35 वर्ष
MahaYojana Doot Online Apply

महा योजना दूत ओळख

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील नागरिकांसाठी ज्या योजना राबवणार आहे . त्या सर्व योजणाची माहिती व अमलबजावणी करण्यासाठी योजना दूत ही नेमण्यात येणार आहेत . तर जर तुम्ही पात्र असाल तर नक्की नोंदणी करून जॉब तुम्ही मिळवू शकणार आहात.

यामध्ये सरकार ही उमेदवार यांच्या सोबत 6 महिन्यांचा करार करून घेणार आहे . कालावधी हा कोणत्याही व्यक्तीला वाढवून देण्यात येणार नाही . ही जॉब फक्त तुम्हाला 6 महीने मिळणार आहे . अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उद्देश हा खालील प्रमाणे आहे.

मुख्यमंत्री योजना दूत योजनेचा उद्देश हा खालील प्रमाणे आहे.

  • महाराष्ट्र राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे.
  • सामाजिक बदल घडवून आणणे.

वरील प्रमाणे योजना दूत उपक्रमाचे उद्देश्य आहेत.

महायोजना दूत पात्रता

महायोजना दूत म्हणून काम करायचे असल्यास तुम्हाला खालील पात्रता या पूर्ण कराव्या लागणार आहे. तरच तुम्ही महायोजना दूध या पोर्टल वरती नोंदणी करू शकणार आहात.

  • उमेदवार यांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे.
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  • अर्जदार यांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार यांच्याकडे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.
  • अर्जदार यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते व ते खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे.

महायोजना दूत कागदपत्रे

महायोजना दूत म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकताही लागणार आहे.

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पदवी प्रमाणपत्र
  • जीमेल खाते
  • आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक

महा योजना दूत फायदे

महायोजना दूत या पोर्टल वरती नोंदणी करून तुम्ही सिलेक्ट झाल्यास तुम्हाला खालील फायदे हे मिळणार आहेत.

  • प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये पर्यंत मानधन.
  • समाजासाठी काम करण्याची संधी
  • प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
  • नवीन काम शिकून कौशल्य विकसित करण्याची संधी

वरील फायदे हे तुम्हाला महायोजना दूत म्हणून काम केल्यास होणार आहेत.